अरब जगाताल उठाव : वादळ की वावटळ?
डिसेंबर 2010 च्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेच्या टोकावर वसलेल्या लहानशा ट्यूनिशिया देशातल्या जनतेने त्या देशावर 23 वर्षे सत्ता गाजविणारे अध्यक्ष झिने अल अबिदिन बिन अली यांच्याविरुद्ध उठाव केला, तेव्हा पुढे घडणाऱ्या महाभारताची ती नांदी आहे असे फारच कमी लोकांना वाटले असेल. पण ट्युनिशियापाठोपाठ शेजारच्या लिबिया आणि इजिप्तमध्येही या उठावाची लागण झाली. 17 जानेवारी 2011 रोजी ट्युनिशियाचे …